Gajlaxmi.

Gajlaxmi.

The argument in favor of using filler text goes something like this: If you use any real content in the Consulting Process anytime you reach.

  • img
  • img
  • img
  • img
  • img
  • img

Get In Touch

जगद्गुरुश्रींचे कालदर्शन या दिनदर्शिकेत जगद्गुरुश्रींच्या वर्षभराच्या कार्यक्रमांची माहिती दिलेली आहे.

या दिनदर्शिकेमध्ये श्रीक्षेत्र नाणीज येथील समस्या मार्गदर्शन, व्यसनमुक्ती, अनुग्रह, उपासक दीक्षा, साधक दीक्षा, इतर पिठांवरील समस्या मार्गदर्शन, जिल्ह्यातील पादुका दर्शन सोहळे , महाराष्ट्र बाहेरील राज्यातील श्री कथासार कार्यक्रम याबाबतची माहिती उपलब्ध असते. सदरचे कालदर्शन दीड वर्ष अगोदरच प्रकाशित केले जाते.

जगद्गुरुश्रींच्या कालदर्शन या दिनदर्शिकेवरून जगद्गुरुश्री नियोजनाला किती महत्त्व देतात हे कळून येईल.

सदरचे कालदर्शन प्रिंट स्वरूपात व डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे.

डिजिटल कॅलेंडर डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करून गजलक्ष्मी एपिके डाऊनलोड करा. Link

आरतीमुळे कीर्तन, विष्णुस्मरण, सख्य, पादसेवन इत्यादी भक्तीचे फळ मिळते. मंदिरात, आश्रमात वेळेप्रमाणे व प्रसंगानुसार आरती केली जाते. या स्वस्वरूप संप्रदायामध्ये मुख्यपीठ श्रीक्षेत्र नाणीजधाम व इतर पिठांवर काकडआरती, धुपारती, सांजारती आणि शेजारती या नित्यनेमाने आरत्या होतात. या संप्रदायमध्ये सोमवार व मंगळवार, बुधवार व गुरुवार, शुक्रवार व शनिवार तसेच रविवार अशा वेगवेगळ्या आठवड्यातील वारानुसार वेगवेगळ्या काकडआरती, धुपारती, सांजराती व शेजारती केल्या जातात.आपण आपल्या घरी देखील अशाप्रकारे आरती करू शकता. जेणेकरून पुण्यसंचय वाढेल व घरातील वातावरण देखील प्रसन्न राहील.

१. काकडआरती : पहाटेच्या वेळी देव देवतेला उठविण्यासाठी काकुळतीने केलेल्या विनंतीला "काकडारती" असे म्हणतात.

२. धुपारती : देवतेचे प्रातविर्धी आटोपल्यानंतर मुख्य आरती केली जाते तिला "धुपारती" असे म्हणतात. या धुपारतीमध्ये देव देवतांचे स्वागत केले जाते.

३. सांजारती : सायंकाळी देव देवतांचा शीण घालविण्यासाठी, त्यांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांची कौतुक वजा स्तुती केली जाते तिला "सांजारती" असे म्हणतात.

४. शेजारती : रात्रौ झोपेच्या वेळी देव देवतांनी झोपावे, दिवसभर आम्हा लेकरांची काळजी घेऊन आपण थकलेले आहेत म्हणून विनवणी करून बालहट्टाने देवतेस झोपावयास भाग पाडावे तिला शेजारती असे म्हणतात.

आपण ऑनलाईन बुकिंग करून डिजिटल स्वरूपात म्हणजेच गजलक्ष्मी एपिकेमध्ये ऑडिओ स्वरूपात ऐकू शकता !
एपिके डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा. Link

जगदगुरुश्रींनी त्यांचे उपास्य दैवत संतशिरोमणी गजानन महाराज व सदगुरु प.पु. काडसिद्धेश्वर महाराज यांच्यावर रचलेले अभंग, भजन व गवळण देखील डिजिटल ऑडियो स्वरुपात खालील प्रमाणे वेगवेगळ्या अभंगांचे संच ऑनलाईन द्वारे उपलब्ध आहेत. आपण गजलक्ष्मी एपिकेमध्ये जाऊन सबस्क्रीप्शन चार्जेस भरून बुकिंग शकता.

- जागा हो मानवा
- लागो छंद जीवा
- मला स्वामींच्या पालखीला येऊ द्या
- नाणीजच्या देवा
- नरेंद्र स्वामी अंतर्यामी
- तुझी स्मृती होता देवा
- यावे तुम्ही घडीला
- अखंड नामसप्ताह
- नरेंद्र चालीसा
- जागा हो मानवा

एपिके डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा. Link

आमच्या येथे संपूर्ण जन्मपत्रिका, जन्म टिपण, गुण मिलन पत्रिका ऑनलाईन काढून मिळेल. याकरिता खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून गजलक्ष्मी ॲपलिकेशन डाऊनलोड करा.

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज प्रणित स्व-स्वरूप संप्रदायाच्या श्रीक्षेत्र नाणीजधाम या मुख्य पिठावर व इतर उपपीठांवर वारी उत्सव सोहळा संपन्न होत असतात.

संत शिरोमणी गजानन महाराज प्रकट दिन, श्रीराम नवमी, गुरुपौर्णिमा, जगद्गुरुश्रींचा जन्मोत्सव, त्रिपुरारी पौर्णिमा, दत्त जयंती या ६ प्रमुख वाऱ्या व समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज जयंती उत्सव आहेत.

या वारी उत्सव सोहळ्यामध्ये लाखोच्या संख्येने भावी-भक्तगण उपस्थित असतात. ज्या भाविकांना काही कारणास्तव या वारी उत्सव सोहळ्यामध्ये उपस्थित राहता येत नाही, तसेच वयोवृध्द, अपंग अशा भाविकांना ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करून आपल्या घरातच वारी उत्सवाचा आनंद घेता येतो.

वारी उत्सवाची (Event) बुकिंग गजलक्ष्मी एपीके मध्ये करू शकता.

गजलक्ष्मी एपिके डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा. Link