धर्मसंस्कार
हिंदू धर्मीय लोक सर्रासपणे अन्य संस्कृतीचे आपल्या घरी-दारी, अवती-भवती आचरण करताना दिसतात. आपली महान संस्कृती, धर्मसंस्कार विसरून अन्य संस्कृतीच्या, संस्काराच्या प्रेमात पडल्यामुळे या भारत देशात सुद्धा हिंदू परका व पोरका झाला आहे. हि अवस्था अशीच राहिली तर येत्या काही काळात संपूर्ण विश्वातून हिंदू धर्म हद्दपार झाल्याचे दुर्भाग्य आपल्या वाट्याला नाही आले तर मिळवले.
हिंदू धर्माला आज राजाश्रयाची गरज आहे. राजाश्रय त्याचवेळी मिळतो ज्यावेळी संघशक्ती एकवटलेली असते. जोपर्यंत आपण संघटित नाही तोपर्यंत आपल्यातील जातीभेद, गरीब - श्रीमंत अशा हानिकारक गोष्टी आपल्यातून जाणे कदापि शक्य नाही. यावर उपाय एकच तो म्हणजे भगवंताच्या नामाची सामुदायिक उपासना.
आपला हिंदू धर्म अनेक संप्रदायांमध्ये विखुरला गेला आहे. त्यामुळे तो एकत्र यावयास हवा असेल तर आपण शैव-वैष्णवांना प्रिय असणारा ओमकार स्वरूप परमात्मा आपल्या हृदयात साठविला पाहिजे. याकरिता सर्व जातीपंथातील हिंदू स्त्री-पुरुषांनी, आबालवृद्धांनी एकत्र येवून, त्या भक्तप्रतिपालक, दिनदयाळू परमात्म्याची धर्मसंस्कार कार्यक्रमातून भक्ती, उपासना करतात.
धर्मसंस्कार या पुस्तकात जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांनी दर आठवड्याला होणारा हा धर्मसंस्कार कार्यक्रम कशा प्रकारे साजरा करावा त्याबाबतची नियमावली, कार्यक्रमात म्हटले जाणारे अभंग, गीत, श्लोक याबाबत विस्तृत माहिती दिलेली आहे.
हे पुस्तक मराठी व हिंदी भाषेत उपलब्ध आहे.