
या गोष्टी त्याला आणि समाजाला हितकार ठराव्यात त्यातून या दोघांनाही निखळ आनंद उपभोगता यावा, माणसाला मनःशांती मिळावी, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे, त्यांच्या मनावर सुसंस्कार व्हावेत याकरिता जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज वेगवेगळ्या ग्रंथ साहित्यातून अध्यात्मशास्त्र या विषयावर लिखाण करत असतात.
या वेगवेगळ्या आध्यात्मिक विषयांवरील लिखाणाचे पुस्तक स्वरूपात प्रकाशन गजलक्ष्मी इंटरप्रायजेस फर्म मार्फत केले जाते. तसेच इतर आध्यात्मिक साहित्याचे प्रकाशन देखील या गजलक्ष्मी इंटरप्रायजेस मार्फत केले जाते.
आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून आध्यात्मिक विचारांचा प्रचार व प्रसार वेगाने होवू शकतो. त्यामुळे गजलक्ष्मी फर्म ने आध्यात्मिक साहित्य डिजिटल करण्याचे देखील ठरविले.
यामुळे वेळ व श्रम या स्वरूपातील अडथळे दूर झाले. आध्यात्मिक साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवून मोबाईल एपिकेद्वारे त्याचे बुकिंग करून ग्राहकाला त्यांच्या मोबाईलवर गजलक्ष्मी एपिकेद्वारे पुरविले जाते. उदा. आरती, डिजिटल कॅलेंडर, वारी उत्सव प्रवचन व वेगवेगळी ग्रंथ संपदा.
ग्राहक आपल्या मोबाईलवर एपिकेद्वारे हे डिजिटल साहित्य डाऊनलोड करून त्याचा आनंद घेत आहेत.
गजलक्ष्मी इंटरप्रायजेस हे प्रोप्रायटरी फर्म असून सौ. एस. एन. सुर्वे ह्या या फर्मच्या प्रोप्रायटर आहेत.
या फर्ममार्फत प्रकाशित होणारे साहित्य खालील प्रमाणे…
1. श्री लीलामृत
2. स्वधर्म दीप आणि भजनमाला
3. जीवन रहस्य
4. जीवन यात्रा
5. भवसागरतील दीपस्तंभ
6. धर्मसंस्कार
7. अमृतवाणी
8. बालामृत
9. आत्मनंदाच्या शोधत
10. भेद अंधश्रद्धाचा
11. प्रवचन सिंधू (भाग १-२)
12. गृहस्थिने कसे वागणे?
13. जागा हो हिंदू बांधवा!
14. ब्रह्मस्फुरण
15. नित्यस्तोत्र
16. जगद्गुरुचे कालदर्शन (कॅलेंडर)